पातळ पोहे चिवडा In Marathi
पातळ पोहे चिवडा
दिवाळीत वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा तयार केला जातो. पोह्याचा चिवडा. कुरमुऱ्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा बनवला जातो. यात पोह्यांचा चिवडा सर्व घरांमध्ये तयार केला जातो.
साहित्य
पातळ पोहे, भाजलेली चणाडाळ, शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप,हिरव्या मिरच्या , तेल , मोहरी, हिंग,हळद,मीठ, साखर,काजू.
पातळ पोहे चिवडा बनवण्याची कृती :-
- पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
- त्यानंतर कढईत तेल घ्या. त्यात शेंगदाणे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्या.
- फोडणीसाठी तेल घ्या.
- तेलात मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, शेंगदाणे हे सर्व साहित्य घालून व्यवस्थित ठवळून घ्या.
- त्यात भाजलेले पोहे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप घालून पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार.
- आता चिवडा तयार झालेला एका कोरड्या डब्यात ठेऊन द्या .
- चिवडा २-३ महिने सहज टिकतो
टीप :
- पोहे चांगले चालून आणि निवडून घ्यावे .जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कचरा राहत नाही आणि चिवड्यात
- चिवडा कोरडया डब्यात काढावा आणि चिवडा काढतांना कोरड्या हाताने काढावा .जेणेकरून , पाणी लागून चिवडा खराब होणार नाही .
Comments
Post a Comment