बेसन लाडू | Diwali Faral Recipe In Marathi

 बेसन लाडू | Diwali Faral Recipe In Marathi


दिवाळीच्या फराळात (Diwali Faral Recipes In Marathi) बेसन लाडू अथवा रवा लाडू नाही असं फार कमी घरांमध्ये दिसून येतं. एकवेळ रवा लाडू नसेल. पण बेसन लाडू तर हवेतच. दिवाळीच्या फराळातील हे बेसनचे तुपातील उत्तम खमंग लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपि जाणून घेऊया.


साहित्य :-


 • बेसन  पीठ ( बारीक / जाड १)  -----------------  ४ वाटी 
 • तूप-------------------------------------------------२ वाटी 
 • पिठी साखर---------------------------------------२ वाटी 
 • बेदाणे ---------------------------------------------२५ ग्रॅम (७-८ )
 • वेलची पूड ----------------------------------------१/२ लहान चमचा (चहाचा  चमचा )
 • दूध ------------------------------------------------१ मोठा चमचा 

 बेसन लाडू बनवण्याची कृती  :-

 • प्रथम एक कढई घ्यावी . कढई गॅस वर ठेवावी आणि गॅस ची आंच मंद ठेवावी 
 • कढई गरम झाल्यावर त्यात तूप टाकून घ्यावे . 
 • तूप गरम झाल्यावर त्यात आता बेसन पीठ टाकावे 
 • तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावे. 
 • गॅस मंद ठेवावा अन्यथा पीठ जळण्याची शक्यता असते आणि पीठ कच्चे राहत नाही . 
 • पीठ चांगले भाजल्यामुळे लाडूची चव हि वाढते. 
 • पीठ भाजून झाले की त्यावर थोडेस दूध शिंपडून बाजूला ठेवावे
 • मिश्रण कोमट झाले की त्यात पिठी साखर, वेलची पूड, बेदाणे घालून पुन्हा एकदा हलकेसे भाजून घ्या. 
 • आता तयार केलेले लाडूचे मिश्रण एका परातीत किंवा मोठया भांड्यात काढून थंड करून घ्यावे . 
 • मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळून घ्यावे आणि थोड्यवेळ बाहेर ठेवावे . 
 •  नंतर एका कोरड्या डब्यात ठेवावे आणि काढतांना  कोरडया हाताने काढावे जेणेकरुन पाणी लागून लाडू खराब होणार नाहीत. 


Comments